Daily Mahasatta

Daily Mahasatta

राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या प्रमुख पदी संतोष बाबर

पेठ (प्रतिनिधी) : पेठ ता. वाळवा येथील  संतोष बाबर यांची राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या पेठ पंचायत समिती गटाच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
   
 जलसंपदा मंत्री ,पालकमंत्री मा. जयंत पाटील  व युवा नेते मा. प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सोशल मीडियाच्या निवडीप्रसंगी बाबर यांची निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी युवा नेते प्रतीक पाटील,वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष विजयबापू पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष संग्राम पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
   
एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला या पदावर नेण्याचे काम राष्ट्रवादीने केले असून या निवडी साठी पेठ चे युवा नेते अतुल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच कै. हणमंतराव पाटील,संपत पाटील,शरद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील, माजी उपसरपंच संदीप पाटील या सर्वांचे पाठबळ व आशीर्वादामूळे मला ही संधी मिळाली असल्याचे बाबर यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments