Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यातील भुईकोट किल्ल्याचे सुशोभिकरण होणार : आ. नाईक

शिराळा (विनायक गायकवाड) : येथील भुईकोट किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला अटक झाल्यानंतर सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला. म्हणून येथे संभाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा, शिल्प, चित्रसृष्टी, स्मारक व किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी आज मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अतुल बेनके आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा येथील भूईकोट किल्ल्यावर शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून आमचे प्रयत्न आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली आहे. सर्वांनी या विकासाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा या कामाबद्दल सातत्याने पाठपुरावा आहे. किल्ल्याचा विकास साधने हा संकल्प आहे.

मंत्री जयंत पाटील म्हणाले, या प्रकल्पाचे काम करताना यातील बांधकाम पूर्णतः शिवकालीन रचणे प्रमाणेच करावे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती चा खर्च या प्रकल्पाच्या उत्पन्नामधूनच व्हावा. भिंतीवरील लेसर शो च्या माध्यमातून किंवा अश्याच पद्धतीने संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट दाखविण्यात यावा. संभाजीराजेंचें भव्य वस्तू संग्रहालय व्हावे. एकाच वेळी संपूर्ण प्रोजेक्ट काम सुरू न करता टप्या टप्प्याने काम सुरू करावे. उपस्थित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आरखाड्याबाबत कांही मार्गदर्शक सुचना केल्या. आरखाड्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

Post a Comment

0 Comments