Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ येथील धनश्री भांबुरे यांची तहसीलदार पदी निवड

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ ता वाळवा येथील सौ.धनश्री सुभाष भांबुरे  यांची नुकतीच तहसीलदारपदी निवड झालेबद्दल येथील शिंपी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
     
सेवानिवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पिसे यांच्या शुभहस्ते  त्यांचा सत्कार करण्यात आला. इस्लामपुर या ठिकाणी अडीच वर्षे नायब तहसीलदार म्हणून सौ भांबुरे या कार्यरत होत्या. या कालावधीत  संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांना गती दिली तसेच तिळगंगा नदी पात्रातील खोलीकरण व बंधारे उभारणी च्या कामात यशस्वी कामगिरी केली.
    
या सत्कार समारंभ प्रसंगी माणिक पेठकर, नामदेव भांबुरे,अंबादास पेठकर,विकास पेठकर,बजरंग भांबुरे,अमोल भांबुरे, मनोज पेठकर ,हणमंत पेठकर ,सचिन पेठकर,सुभाष कोळेकर,माधुरी पेठकर आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी  आभार तुळशीदास पिसे यांनी मानले.

पेठे ग्रामपंचायत चे सदस्य तसेच विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे चे चेअरमन डॉ. सुभाष भांबुरे यांच्या पत्नी होत. विशेष म्हणजे धनश्री भांबुरे यांची लहान बहीण रोहिणी दिवटे सद्या गगनबावडा या ठिकाणी नायब तहसीलदार पदी कार्यरत होत्या त्यांची    सुद्धा तहसीलदार पदी निवड झाली आहे. सख्ख्या बहिणी तहसीलदार पदी होण्याचा योगायोग घडून आला असून परिसरातून त्यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments