Daily Mahasatta

Daily Mahasatta

जोराच्या पावसाने घरकुलांना घेरले, नागरीकांच्या मदतीला नगराध्यक्ष धावले

इस्लामपुर (सुर्यकांत शिंदे) : उरूण-इस्लामपुर शहराला काल रात्रीपासुन  पाऊसाने झोडपून काढले, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील नाले गटारी व रस्ते पहाटे पर्यत ओसंडुन वाहु लागले होते. तर शहरातील कापुसखेड नाका परीसरातील घरकुलाच्या इमारतीच्या भवताली परीसरात पावसाचे पाणी साचुन राहिले होते.
    
आज सकाळी घरकुलातील काही नागरीकांनी  नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना थेट संपर्क करुन परिस्थिती सांगितली. यावर निशिकांत भोसले-पाटील यांनी तात्काळ  घरकुलाकडे धाव घेत परिस्थितीची पहाणी करत नागरीकांशी संवाद साधला व तात्काळ उपाययोजना सुरु  करुन नागरीकांना आधार दिला.  नगराध्यक्ष तात्काळ येऊन लोकांची विचारपूस केली त्यामुळे  घरकुलात राहणाऱ्या नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
          
कापुसखेड नाका परीसरात घरकुलाच्या इमारती गेल्या अनेक वर्षापुर्वी उभा केल्या आहेत मात्र इमारतीचे फांऊडेशन हे कमी उंचीचे वतात्कालीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गटारीचे योग्य नियोजन  न केल्याने कापुसखेड नाका पावसाचे पाणी घरकुल परीसरात साचुन रहाते.काल रात्रीच्या जोराच्या पावसाने दरवर्षीप्रमाणे पाणी साचल्याने नागरीकांनी नगराध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांच्याशी संपर्क साधला यावेळी  उपाययोजनेला तात्काळ सुरुवात झाली व पाण्याचा निचरा होऊ लागला.
            
सध्य परिस्थीतीत जेसीबीने साचलेले पाणी गटर काढुन ओढ्याला सोडण्याचे काम नगराध्यक्ष यांच्या आदेशाने युध्दपातळीवर सुरु झाले असुन पाण्याचा निचरा झपाट्याने होऊ लागला आहे.
         
यावेळी सतेज जयवंत पाटील,जफर खाटिक, फिरोज मुंडे, युसूफ मुंडे,राजु पठाण,अर्जुन बडे,राकेश दाटिया,सचिन राठोड,सौरभ कांबळे,आधिक माने,सुरेश कुकडे,पोपट भोसले,रशिद वारर्से, सूर्यकांत वडार,आरबाज मुल्ला,कैलास महापुरे,रियाज पटेल,नगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments