Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ८७७ कोरोना पॉझिटिव

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज गुरुवार ता. १७ रोजी ८७७ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात  पंचवीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर देखील सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा अजून देखील नियंत्रणात आला नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यभरात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असताना सांगली जिल्ह्यात मात्र दररोज ९०० ते १००० यादरम्यान कोरोना चे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दररोज सुमारे तीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर  बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आणखी धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात मायकरोमायकोसिस मुळे आतापर्यंत २५३ रुग्ण बाधित झाले असून यापैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीला जिल्ह्यात ९ हजार ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यातील ५८७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले कोरोना ग्रस्त रुग्ण पुढील प्रमाणे आटपाडी ४२, जत ५५, कडेगांव ६२, कवठेमहांकाळ ३१, खानापूर ६५, मिरज ९०, पलूस ७२, शिराळा ४३, तासगाव ११४, वाळवा १८१, तसेच सांगली शहर ९८ आणि मिरज शहर २४ असे एकूण ८७७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Post a Comment

0 Comments