Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी पदनिर्मितीचे आदेश

वांगी (सचिन मोहिते) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला असुन १५ कर्मचारी पदनिर्मितीच्या प्रस्तावास  राज्य शासनाने आदेश काढले आहेत.  वांगीतील जनतेने केलेला उठाव व मागणीनंतर बऱ्याच राजकीय नाट्यमय  घडामोडी नतंर  राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करणेसाठी सतत पाठपुरावा केला होता. 

सध्या प्राथमीक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांवरती उपचार सुरु असुन कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर लगेचच आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्णांवर उपचारास सुरुवात होणार आहे. या आरोग्य केंद्राचा लाभ वांगी, शिवणी, शेळकबाव, हिंगणगाव खुर्द, तडसर, अंबक, शिरगाव, रामापूर आदी गावांतील रुग्णांना होणार आहे. जनतेने केलेल्या मागणीचे शासनस्तरीय निर्णयामुळे वांगीसह परिसरातील जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे .

Post a Comment

0 Comments