Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानेश्वरी दाभोळेचे यश‌‌

पेठ (रियाज मुल्ला) : कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पेठ येथील विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी धनाजी दाभोळे हिने स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,पुणे यांचे वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. 

या यशाबद्दल तिला आयोजकांमार्फत प्रमाणपत्र व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक कार्य हे पुस्तक पारितोषिक स्वरूपात भेट देण्यात आले. तसेच शिवगर्जना फाउंडेशन, सातार्डे कोल्हापूर यांचेवतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत ज्ञानेश्वरीच्या चित्राचा "विशेष चित्र" म्हणून गौरव करण्यात आला. तिला आयोजकांमार्फत सन्मानपत्र देण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक जे.पी. पाटील, कार्याध्यक्ष एन्. डी. पाटील व उपकार्याध्यक्षा व्ही. आर. माळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments