Daily Mahasatta

Daily Mahasatta

आळसंद कोविड सेंटरला प्रतिक जयंतराव पाटील यांची भेट

विटा (प्रतिनिधी) : आळसंद (ता.खानापूर) येथील छत्रपती शिवाजीराजे कोविड केअर सेंटर व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचातीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास आणि लसीकरण केंद्रास युवा नेते प्रतिक जयंतराव पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.यावेळी राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, सरपंच सौ.इंदूमती जाधव, नितीनराजे जाधव प्रमुख उपस्थित होते.

युवा नेते प्रतिक पाटील यांनी प्रथमतः छ.शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी योगदान देत असलेल्या आळसंद ग‍ावच्या लोकनियुक्त महिला सरपंच, यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व आरोग्य सेविका ,आशासेविका, दक्षता समिती यांचा प्रतिक पाटील व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. गावामधील लसीकरण केंद्रास भेट देऊन त्याठिकाणी मदतकार्य करणार्‍या प्रविण जाधव,सुशांत जाधव, वैभव काटकर ,अक्षय कारंडे ,स्वरूप काटकर, अवधूत जाधव,अमित जाधव ,सुधाकर जाधव व समर्थ ग्रुपचे त्यांनी कौतुक केले. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी गावामध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी वाझरचे मधुकर सुर्यवंशी, आळसंदचे पोलिस पाटील गणेश शेटे, नंदकुमार जाधव, संभाजी जाधव, पदवीधर अजित जाधव, अण्णासो जाधव ,मारुती जंगम, डॉ.संग्राम जाधव, डाॅ.हिम्मत पाटील,  मनोहर चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संदिप बनसोडे,भरत हारुगडे,खंडेराव जाधव, दौलत जाधव, भरत जाधव, कैलास जाधव, श्रीरंग शिरतोडे, सुरेश हारुगडे , , कृष्णत महाडीक, मोहन जाधव, अशोक जाधव, अमोल जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments