Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

भारती दंत महाविद्यालयात तंबाखू विरोधी दिन

सांगली (प्रतिनिधी) : येथील भारती दंत महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी दिली.

प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड प्रमुख उपस्थित होत्या. सामाजिक दंतशास्त्र विभाग व तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू विरोधी जनजागृती संदेश एफ एम रेडिओवर देण्यात आले. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी मुलाखतीमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती अडथळे व त्यावर मात करण्याचे उपाय सांगितले. येथील कर्मचार्यांना तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. सर्व दंत विशेषतज्ञांसाठी   ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याचा सर्वांनी लाभ घेतला. विभागप्रमुख डॉ. श्रीवर्धन कलघटगी, डॉ. तनुश्री दळवी, डॉ. स्वप्निल मेथा, डॉ. चेतन पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments