Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रकाश हॉस्पिटल ॲट्रॉसिटी प्रकरणातील पाच जणांना जामीन मंजूर

इस्लामपूर (हैबत पाटील) : प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील डाॅक्टर व सहकारी स्टाफवर फसवणुक व ॲट्राॅसिटी सारखा  गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई हायकोर्टात जामीनसाठी या सर्वांनी अर्ज दाखल केला होता.   आज त्याच्यावर सुनावनी होऊन सर्वाना जामीन मंजुर करण्यात आला. अभिमन्यू पाटील, इंद्रजित पाटील, विश्वजित पाटील, प्रवीण माने, व एक अज्ञात इसम या  पाच जणांच्या विरोधात नंदू नामदेव कांबळे यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली . जामिना साठी मुंबई नायलायत अर्ज दाखल केला होता . त्या सर्वांना जामीन मंजूर झाला या वर बोलताना खर्‍या अर्थाने न्यायदेवतेने कोरोना योध्दांना न्याय दिला आहे. या न्यायाचा आम्ही सर्व डाॅक्टरर्स व सहकारी स्टाफ आदर करतो,भविष्यात प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर आरोग्य सेवेत अधिक जोमाने काम करेल,तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक दु:खात व संकटात आम्ही यापाठीमागे बरोबर होतो. यापुढे ही बरोबर रहाणार आहोत 

यामध्ये अनेक सामाजीक संघटना ,मराठी क्रांती मोर्चा, पक्ष व पदाधिकारी यांनी विविध प्रशासन व पोलिस अधिकारी यांना सदरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा आम्ही अंदोलन करु असा इशारा देऊन हॉस्पिटल बद्दल सहानभुती दाखविली याबद्दल अशा सर्व सामाजीक संघटना,मराठी क्रांती मोर्चा,पक्ष व पदाधिकारी यांचे प्रकाश हॉस्पिटल च्या वतीने आभार मानतो . असे मत प्रकाश कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments