Daily Mahasatta

Daily Mahasatta

अपेक्स कोव्हिड हॉस्पीटलच्या डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

: भाजपची मागणी

सांगली (प्रतिनिधी) : येथील अपेक्स कोव्हिड हॉस्पीटलच्या डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दीपक माने व अमित भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
 
याबाबत जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हंटले आहे, 
कोरोना काळात गेली  दीड वर्षे अपेक्स  कोव्हिड हॉस्पीटल मध्ये अनेक पेशंट वर चुकीचे उपचार केल्यामूळे पेशंट चां मुत्युं झाला आहे . या डाॅक्टरांच्यावर वर यांच्या अगोदर ही अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. सांगली महानगरपालिकेने या डॉक्टरांनी पेशंटची  व जिल्हा प्रशासनाची  फसवणुक केल्याचा  गुन्हा दाखल केला आहे . पण हे पुरेसे नाही ज्या पेंशटवर चुकीचे उपचार, निष्काळजीपणा मुळे  पेंशट मुत्युमुखी पडले आहेत त्यास कारणीभूत असणारे अॅपेक्स  हॉस्पीटलच्या डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद व्हावा व डॉक्टर व हॉस्पिटलचे लायसन्स रद्द  व्हावे जेणेकरून या डॉक्टर मुळे  आणखी कोणत्याही पेशंटचा मुत्यु  होऊ नये.  

याबाबत जिल्हाधिकारी सांगली, उपायुक्त सांगली मनपा, पोलिस अधीक्षक सांगली , पोलिस निरीक्षक गांधी चौकी पोलिस स्टेशन मिरज यांना  भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हाच्या वतीने संघटक सरचिटणीस दीपक माने व अमित भोसले यांनी निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments