Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत वस्त्यांमध्ये कोरोना तपासणी सुरू

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेकडून कोरोना चाचणीवर अधिक भर देण्यात आला आहे. विशेष सार्वजनिक आस्थापना आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी मोहिमेला गती देण्यात आली असून याअंतर्गत सांगलीत डी मार्टमधील ग्राहक कर्मचारी यांच्याबरोबर मिरज कुपवाड आणि संजयनगर पत्र्याची चाळमध्येही स्थानिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.
      
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे हा वाढत संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त कापडणीस यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. यानुसार शुक्रवारपासून मनपाक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी आणि व्यापारी आस्थापनामध्ये कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी डी मार्टमधील ग्राहक आणि आस्थापनेवरील कर्मचारी यांची रॅपिड आणि आर्टिपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान नगर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शीतल धनवडे यांची वैद्यकीय टीम कार्यरत होती. यावेळी सहायक आयुक्त एस एस खरात, वरिष्ठ स्वछता निरीक्षक अविनाश पाटणकर, निरीक्षक अंजली कुदळे, राजू गोंधळे, डी मार्ट व्यवस्थापक ऋषीकेश नाईक आदी उपस्थित होते. 
     
दरम्यान संजयनगर येथील पत्र्याची चाळ परिसरातील नागरिकांचाही रॅपिड आणि आर्टिपीसीआर टेस्ट करण्यात आली. याठिकाणी उपायुक्त राहुल रोकडे, स्थानिक नगरसेवक मनोज सरगर, संजय कांबळे , मनपाचे अधिकारी काका हलवाई आदी उपस्थित होते. मिरजेतही उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, आणि कुपवाडमध्ये सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या टीमने नागरिकांचे, व्यापारी, विक्रेते आणि ग्राहक यांची रॅपिड आणि आर्टिपीसीआर कोरोना चाचणी सुरू केली आहे. यामध्ये सांगलीत संजयनगर येथे एक व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना गृह विलगिकरन करण्यात आले आहे. मनपा क्षेत्रात वाढत संसर्ग रोखण्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे जे छुपे कोरोना संशयित रुग्ण आहेत यांचा शोध घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments