Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कडेगाव तालुक्यात निघृण खून, आरोपी फरार

कडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव तालुक्यातील तडसर येथे आज बुधवार ता. २ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राचे वार करत एका इसमाचा निघृण खून केला आहे. धनाजी भीमराव कोळी वय -४५ रा. कुंडल, ता. पलूस असे मयत व्यक्तिचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी कोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, तडसर येथील माळी वस्ती, कासार डेपो हद्दीतील ऊसाच्या शेतात धनाजी कोळी यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन संबधित इसमाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मयताच्या उजव्या कानाच्या बाजूला तसेच डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे. 

याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल असून सहायक पोलिस निरीक्षक गोसावी हे अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments