Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवप्रताप चा उपक्रम राज्यात आदर्शवत : मंत्री डॉ विश्वजीत कदम

 विटा (प्रतिनिधी) : कोरोना काळात ज्यांनी साथ नियंत्रणात आणणेसाठी धोका घेऊन जास्त काम केले आहे, अशा आशा वर्कर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन शिवप्रताप मानव कल्याण संस्थेने दोन महिन्याचे मानधना इतकी रक्कम धनादेशा द्वारे दिली आहे. हा उपक्रम राज्यात आदर्शवत असा आहे, असे मत राज्यमंत्री डॉ. विश्वजीत उर्फ बाळासो कदम यांनी व्यक्त केले.

मंत्री कदम म्हणाले, प्रतापशेठ साळुंखे यांचे मार्गदर्शना खाली विठ्ठलराव साळुंखे यांनी हा चांगला उपक्रम राबविला आहे. याचे अगोदर सुध्दा विठ्ठलराव साळुंखे यांनी, शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या माध्यमातुन सॅनिटायझर, मास्क, गरजु लोकांना अन्न धान्य किट वाटप केले, तसेच नाभिक समाजाकरिता धान्य किट वाटप , असे चांगले कार्य केले आहे. कोरोना लाट गेलेली नाही, म्हणून मास्कचा वापर तसेच सामाजिक दुरावा व सॅनिटाझरचा वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणे टाळावे, तसेच मोठे समारंभ करु नयेत, अशा पद्धतीने आपण कोरोना प्रादुर्भाव होण्यापासून रोखु शकु.

यावेळी, युवा नेते मा. डॉ. जितेश (भैया) कदम, उपविभागीय अधिकारी मा. भोर साहेब, तहसिलदार मा. ऋषिकेत शेळके, पोलिस निरिक्षक मा. डोके साहेब, आरोग्य अधिकारी मा. डॉ. अविनाश लोखंडे, आळसंद गावचे सरपंच सौ, इंदुमती जाधव, श्री. संग्रामसिंह जाधव, श्री. सयाजीराव धनवडे, माजी सरपंच भाळवणी, श्री सिताराम हारुगडे, श्री, कृष्णत महाडीक (मामा), श्री. सुभाष (नाना )सुर्वे, श्री. अजित जाधव, श्री. गणेश जाधव, श्री. रमेश शिरतोडे, श्री. सतिश सुर्यवंशी, श्री. खंडू (भाऊ) बारबट्टे, श्री. श्रीरंग शिरतोडे, श्री. गणेश भोसले, श्री. अनिल जाधव, श्री. सत्यवान चव्हाण, श्री. प्रविण जाधव सरपंच बलवडी, श्री, दिपक पवार, श्री. संभाजी सुर्वे व सर्व आशा वर्कर, आळसंद गावचे ग्रामस्थ सोशल डिस्टंसिंग पाळून हजर होते.

Post a Comment

0 Comments