Daily Mahasatta

Daily Mahasatta

मिरजेत डॉ. एल. आर. भोसले यांना अभिवादन

मिरज  (प्रतिनिधी) : मिरजेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. डॉ. एल आर भोसले यांच्या ९१ व्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालय येथील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोना संकटात कार्यरत असलेल्या आशा सेविकांचा सत्कार करुन त्यांना उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले.


डॉ. एल. आर. भोसले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ.  विनोद परमशेट्टी, उपायुक्त स्मृती पाटील, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक संजय मेंढे, नगरसेवक करण जामदार, शिवाजी दुर्वे, डॉ. एल. आर. भोसले ट्रस्टचे विश्वस्त डॉ प्रताप एल भोसले, अँड, ए. आर. जाधव, भाऊसाहेब पाटील, विनायक यादव, दलजीत सिंग, खतीब शेख, अरुण गवंडी, सचिन हत्तरगी, डॉ. किरण भोसले, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. खरात, डॉ.अक्षय पाटील, डॉ. कापसीकर, मिरज विभागातील आशा सेविका, परिचारिका, कर्मचारी उपास्थित होते. 


उपस्थितांचे स्वागत डॉ. प्रताप भोसले यांनी केले. जयंतीचे औचित्य साधून मिरज विभागातील आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना संकटाला रोखण्यासाठी आशा सेविकांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र त्यांना मिळत असलेले वेतन अल्प आहे. त्यांना त्यांच्या कामाचा समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्ववासन महापौर दिग्विजय सुर्यवंशी व पृृृथ्वीराज पाटील यांनी दिलेे. आशा सेविकांना उपयुक्त वस्तूंचे कीट व येणारा पावसाळा गृहीत धरून रेनकोटचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. किरण भोसले यांनी केले.

Post a Comment

0 Comments