Daily Mahasatta

Daily Mahasatta

कृष्णा घाट रस्त्यावरील रेल्वे पुलाची समस्या सुटणार : आ. सुरेश खाडे

सांगली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील तानंग फाटा ते शास्त्री चौक या १०.८ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम व कृष्णा घाट रस्त्यावरील रेल्वे पुलाची समस्या आता कायमची सुटणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिली

मिरज शहरातील प्रमुख प्रलंबित रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. या रस्त्याच्या मालकी वरून अनेकदा हे काम रखडले गेले होते. मिरज कृष्णाघाट रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या संदर्भात माहिती देताना आमदार खाडे म्हणाले की अनेक वर्षांपासून रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग मुळे नागरिकांचे हाल होत होते. रुग्णवाहिकाना रस्त्यावरील खड्डयांमुळे अडथळे रुग्णास होतं होते. महापालिकेने आतापासूनच अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात करावी कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही बाजूने नव्याने जोडल्या जाणाऱ्या या रस्त्याचे काम महामार्गाच्या पद्धतीने होणार आहे आणि येत्या महिन्यात हे पूर्ण होईल. रस्त्याची रुंदी किमान शंभर फूट असणार आहे,रस्त्याच्या कडेला आकर्षक दिवे लावले जाणार आहेत.

 पावसाळ्यात पाणी निचरा होण्यासाठी गटारीं केल्या जाणार आहेत. या कामासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी २७ कोटी ४९ लाख रु निधी तसेच ३५ कोटी १९ लाख रु रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी  मंजूर केले आहेत.  मिरज शहरातील प्रमुख दोन प्रलंबित समस्या मार्गी लागणार आहेत. पर्यायाने सांगली कोल्हापूर सह कर्नाटकातील नागरिकांची सोय होणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments