Daily Mahasatta

Daily Mahasatta

विना परवाना श्वानांच्या शर्यती, दोघा जणांवर गुन्हा दाखल

पेठ (रियाज मुल्ला) : विना परवाना श्वानांच्या शर्यती आयोजित केल्याने दोघा जणांवर कुरळप पोलिसांत गुन्हा दाखल केला. छापा टाकून  7 मोटारसायकल सहित 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  
पुणे बेंगलोर महामार्गावरील कुरळप पोलीस ठाणे हद्दीतील कणेगांव गावातील कणेगांव ते बहादुरवाडी जाणारे रोडवर गावठी कारवानी श्वानांच्या शर्यती आयोजित करणार असल्याची माहिती कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना मिळाली होती. यावरून सदर ठिकाणी कुरळप पोलीसांनी छापा टाकून करण भास्कर शिरतोडे रा. कणेगाव व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले तर बाकी लोक पळून गेले. 

या शर्यती साठी कराड उंब्रज व बाहेरून ही लोक आलेचे समजते. सदर ठिकाणहून पोलीसांनी एकुण 7 मोटर सायकली अंदाजे २, लाख ९० हजार रु किंमतीच्या जप्त करणेत आलेल्या असून पोलीस ठाणेत लावणेत आलेल्या आहेत. सदरबाबत पो ना भूषण महाडीक यांनी फिर्याद दिलेने कणेगांव येथील दोघांचेवर कुरळप पोलीस ठाणेत भादविस कलम १८८,२६९ तसेच महा.पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयाचा तपास सपोनि जाधव सो, यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पो ना अनिल पाटील करीत आहेत.  कोरोना रोगाचे प्रादुर्भाव रोखण्याचे अनुशंगाने सहकार्य करावे व कोरोना रोग प्रसार होईल असे कृत्य केलेस कठोर कारवाई करणेत येणार  असल्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी  कुरळप पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांना  केले आहे..

Post a Comment

0 Comments