Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंडप व्यावसायिकांना एक महिन्याचे रेशन किट

: सुधीरदादा गाडगीळ यांचे दातृत्व

सांगली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वप्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी असल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्सचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना मदत करण्याची गरज आहे, असे मत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले.

मंडप,लाईट,फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणींसंदर्भात आ.गाडगीळ यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आ.गाडगीळ यांच्यावतीने संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्यावतीने आ.गाडगीळ याना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे,'आमच्या संघटनेचे १४०० पेक्षा अधिक सभासद आहेत. सध्या कोविडमुळे आमची २ वर्षे वाया गेली आहेत. शासकीय निर्बंध असल्याने सध्या सर्वप्रकारच्या कार्यक्रमांना बंदी आहे. आमचा संपूर्ण व्यवसाय ठप्प असल्याने अनेकांची परिस्थिती अत्यंत हलाखाची बनली आहे. कित्येकांची चूलही पेटत नाही. अशा अडचणीच्या परिस्थितीतही शासनाकडून काहीही मदत मिळत नाही. लॉकडाउनमुले कोठेही काम मिळत नाही. आम्ही आमच्या संघटनेतर्फे गरजू सभासदांना एक महिन्याचे रेशन किट देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे उद्योग बंद असल्याने आम्ही जमा केलेला निधी अपुरा पडत आहे. तरी आपण आम्हाला मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे .असे म्हटले आहे. 

याप्रसंगी प्रदेश सदस्य शेखर इनामदार, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, संघटक सरचिटणीस दीपक माने, नगरसेवक संजय कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, सुब्राव मद्रासी,युवराज बावडेकर,जगन्नाथ ठोकळे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, नंदू सूर्यवंशी, शिवाजी माळी,मारुती शेळके यांच्यासह अन्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments