Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगीतील श्री अंबिकादेवी कोव्हिड सेंटर जिल्ह्यामध्ये आदर्श ठरणार : रुग्णांसाठी भजन किर्तन व व्याख्यानांचे आयोजन

कडेगाव (सचिन मोहिते) : वांगी (तालुका कडेगाव) येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता . कोरोनावर नियत्रंण मिळवणेसाठी ग्रामपंचायत वांगी व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या श्री. अंबिकादेवी कोव्हिड सेंटर मध्ये रुग्णांना चांगल्या पद्धतीने सुविधा देण्यात येत आहेत. कोव्हीड सेंटरमध्ये सकाळी योगा व व्यायाम त्यानंतर चहा, नाष्टा व अंडी तसेच दुपारी शाहाकारी जेवण व रोज रात्रीच्या आहारामध्ये चिकन देण्यात येत आहे. 

कोव्हिड सेंटरमधील रुग्णांची मानसिकता व मनोबल वाढविणेसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम व व्याख्याने आयोजित करुण त्या कार्यक्रमाद्वारे रुग्णांना मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी वांगीतील शिवव्याख्याते ओंकार औंधे यांनी आपल्या व्याख्यानातून शिवराय व आजची परिस्थिती या विषयातून रुग्णांशी संवाद साधला. तसेच वांगीतील संत सावता माळी भजनी मंडळ यांनी आपल्या श्रुश्राव्य भजनातून रुग्णांना मंत्रमुग्ध केले. तर सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले ह. भ. प. सतिश झेंडे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून रुग्णांच्या मनात नवचेतना निर्माण केली. या सर्वच कार्यक्रमामुळे रुग्णांच्यात मानसीक व शारिरिक उर्जा निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे .

 इथून पुढेही रोज नवनवीन मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, गावातील ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह येत आहे. अशा रुग्णांनी तात्काळ श्री अंबिका देवी  कोविड केअर सेंटरचा लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबीयांचा व गावचा कोरोनापासून बचाव करावा . येथील सर्व मोफत सुविधाचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरंपच , ग्रामपंचायत , व दक्षता कमिटि यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments