Daily Mahasatta

Daily Mahasatta

काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदी विनायक विश्वनाथ तांदळे

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. विनायक तांदळे रा. इस्लामपूर यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष श्री. तुकाराम माळी यांनी केली आहे. सदर नियुक्तीचे पत्र शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते काँग्रेस भवन सांगली येथे देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस चे सचिव श्री. सचिन चव्हाण, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. देशभूषण पाटील, शहर जिल्हा अध्यक्ष श्री. अल्ताफ पेंढारी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. महावीर पाटील, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अजित ढोले, लीगल सेलचे अध्यक्ष श्री. भाऊसो पवार, सेवादल संघटक श्री. मौलाभाई वंटमोरे, मानवाधिकार परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. नितीन पेठकर, जिल्हा सचिव काँग्रेस कोल्हापूर श्री. रघुनाथ पिसे, जिल्हा प्रवक्ता काँग्रेस कोल्हापूर श्री. रणजित पाटील, श्री. अशोक मासाळ, माजी शिंपी समाज अध्यक्ष श्री. पुंडलिक गोंदकर, श्री. संजय पवार , श्री. म्होसीन मणेर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments