Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत सहा दुकानांवर कारवाई

 : 46 हजाराचा दंड वसूल
: पोलीस आणि महसूल प्रशासनाचाही सहभाग

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीत लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करीत आस्थापना सुरू केल्याबद्दल सहा व्यापारी आस्थापनावर महापालिका प्रशासनाने कारवाई करीत 46 हजाराचा दंड वसूल केला. कारवाईत महापालिकेबरोबर महसूल आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग घेतला होता. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे. 

सांगली शहरात ज्या आस्थापनाना उघडण्यास परवानगी नाही अशा काही आस्थापना सुरू असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकासह अप्पर तहसीलदार अर्चना पाटील, सहायक आयुक्त अशोक कुंभार आणि पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी शहरात आपल्या पथकासह संबंधित दुकानावर कारवाई केली. यावेळी सांगली शहरातील चार दुकाने आणि टिम्बर एरिया आणि स्टेशन रोडवरील दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये 46 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments