Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रा. आर. बी. पाटील यांच्याकडून सभेच्या शिष्यवृत्ती फंडासाठी रु.1 लाखाचे बृहत्दान

जयसिंगपूर : देणगीदार प्रा.आर.बी.पाटील यांचा सन्मान करताना चेअरमन रावसाहेब पाटील, डावीकडून डॉ. स्वप्निल पाटील, इंजि.संदिप पाटील, सौ. वासंती आर.पाटील, मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील, विभागीय महामंत्री शांतिनाथ नंदगावे व विभागीय उपाध्यक्ष  प्रशांत पाटील (मजलेकर).

जयसिंगपूर (प्रतिनिधी): येथील काडगेमळ्यातील निवृत्त प्राध्यापक श्री. आर. बी.पाटील यांनी ‘श्रुत पंचमी’चे औचित्य साधून दक्षिण भारत जैन सभेच्या लक्ष लक्ष शाश्‍वत शिष्यवृत्ती फंडासाठी रु. 1 लाखाचे बृहत्दान दिले. सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. यावेळी मुख्यमहामंत्री डॉ. अजित ज. पाटील, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पाटील (मजलेकर), महामंत्री शांतिनाथ नंदगावे, सौ. वासंती आर.पाटील, श्री. संदिप व डॉ.स्वप्निल राजगोंडा पाटील उपस्थित होते. 

कोरोनासारख्या महामारीच्या काळातही सभेच्या कार्याची दखल घेत शिष्यवृत्ती निधीसाठी देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत प्रा. आर. बी. पाटील यांचा श्री. रावसाहेब पाटील यांनी सन्मान केला.
प्रा. आर. बी. पाटील यांचे मूळ गाव दुधगाव असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावीच झाले. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी पुढे आष्टा येथून बी. ए. ची पदवी घेतली. शिवाजी विद्यापीठातून एम.ए. तर भूगोल विषयातून त्यांनी सांगली येथे सन 1970 दरम्यान त्यांनी बी.एड्. ची पदवी संपादन केली. शिक्षण घेत असताना त्याकाळी शिष्यवृत्तीच्या रूपाने दक्षिण भारत जैन सभेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे ते कृतज्ञतापूर्वक नमूद करून आपल्याप्रमाणे समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी देणगी दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. पाटील हे काडगे मळ्यातील दिगंबर जैन मंदिरचे ट्रस्टी आहेत. जिनमंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना दोन मुले असून चि. संदिप हे सिव्हील इंजिनिअर असून नोकरीत करतात तर डॉ. स्वप्निल हे बी. डी. एस. असून जयसिंगपूर, सांगली व दुधगाव येथे प्रॅक्टीस करतात. सूना सौ. दिपाली संदिप पाटील (बेडकिहाळ) व डॉ. सौ. अश्‍विनी स्वप्निल पाटील (बी.डी.एस.-इचलकरंजी) तसेच नातवंडे अद्वित, सिध्दी, शरण्या असा सुखी परिवार आहे.
दक्षिण भारत जैन सभेच्या या समाजोपयोगी उपक्रमास बृहत्देणगी दिल्याबद्दल प्रा.आर.बी.पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.

Post a Comment

0 Comments