Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड शहर काँग्रेसतर्फे रिक्षा ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या स्मरणार्थ कुपवाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सनी धोतरे यांच्यावतीने आज देशाचे पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुपवाड मधील कोविड बाधीत रुग्णा करीता मोफत रिक्षा ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. ही रिक्षा ॲम्बुलन्स सध्य कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे शहरातील रस्ते लहान आहेत ही गोष्ट लक्षात ठेवून रिक्षा ही सहज घरापर्यंत पोहोचू शकते असे सनी धोतरे यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते, नगरसेवक संतोष पाटील, बिपीन कदम, रवींद्र खराडे, महावीर पाटील, देशभूषण पाटील, अल्ताफ पेंढारी, नेमिनाथ बिरनाळे, अजित ढोले, अमित पारेकर, संतोष भोसले, आशिष चौधरी, मौलाली वंटमुरे, सुएल बलबंड, सचिन चव्हाण, भारती भगत, नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील, रहिम हट्टीवाले, प्रशांत देशमुख, महंमद शेख, इर्शाद सोलापुरे, अशोक रासकर, इब्राहीम मुलाणी, डॉ. देसाई, पैगंबर शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments