Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शिराळा : प्रभाग १५ मधील प्रलंबित कामे पूर्ण करा : नेहाताई सुर्यवंशी

शिराळा: प्रभाग क्रमांक १५ मधील रखडलेली विकासकामे करावीत म्हणून मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देताना नगरसेविका सौ. नेहाताई सूर्यवंशी.

शिराळा (विनायक गायकवाड) : शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील प्रलंबित व अनेक दिवसांपासून मागणी असणारी गरजेची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा आशयाचे निवेदन नगरसेविका सौ. नेहाताई सूर्यवंशी यांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना दिले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १५ मध्ये सुगंधा नगर, एस टी कॉलनी, कोकरुड रस्ता, प्राध्यापक कॉलनी व नवजीवन वसाहत येथील गरजेची कामे अनेकदा सांगून देखील पूर्ण होत नाहीत. हि कामे कोणत्याही मंदिराचे किंवा परिसराचे सुशोभीकरण करण्यापेक्षा महत्वाची आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अंतर्गत रस्ते, गटर, पथ दिवे, स्मशान भूमी, कॉंक्रीटीकरण अशा सुविधा गेल्या २० वर्षांपासून त्यांना अद्याप मिळालेल्या नाहीत.

सदरची कामे रखडल्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत गेल्या ४ वर्षात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे मात्र नगरपंचायतच्या सत्ताधारी पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. माझ्या प्रभागाला न्याय देण्यात जाणून बुजून कूसुर केला जात आहे. तरी या निवेदनाचा विचार करून या प्रभागातील कामे मार्गी लावावीत.

Post a Comment

0 Comments