Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यला मोठा दिलासा, कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात सोमवार ता.10 रोजी 1338 रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 39 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

आज सोमवार ता.10 रोजी जिल्हयात 1338 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. जिल्हयात कोरोनामुळे होणार्‍या मृत्युचा आकडा कायम आहे. आज दिवसभरात 39 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झालाआहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक 12 तर खानापूर तालुक्यात 4 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सद्या 16 हजार 992 रूग्ण उपचाराखाली आहेत. आज 1284 रूग्णांनीकोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

आज सांगली जिल्हयाततालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण पुढील प्रमाणे ः आटपाडी-94, जत- 297, कडेगाव -81, कवठेमंहकाळ- 78, खानापूर 144, मिरज -173, पलूस-48, शिराळा -58, तासगाव -87, वाळवा- 149, तसेच सांगली शहर- 84 आणि मिरज शहर -45 असे एकूण 1338 रूग्ण आज सोमवार ता.10 रोजी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments