Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंगलनाथ मंदिराच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर : आ. मानसिंगराव नाईक

मांगले (राजेंद्र दिवाण)
वारणा मोरणा नदीच्या संगमावर वसलेले मांगले येथील ग्रामदैवत मंगलनाथ मंदिराच्या समोरच्या जागेत नवीन भव्य सभामंडपासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून दुसऱ्या टप्प्यात आणखी २० लाखाचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .

ते म्हणाले मांगले व परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगलनाथ मंदिराच्या समोरच्या जागेत सभामंडप व्हावा अशी गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. २०१४ साली मी आमदार असताना सभामंडपासाठी निधी मंजूर केला होता. या कामास सुरवातही होणार होती , दरम्यानच्या काळात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यामुळे नंतरच्या लोकप्रतिनिधींनी मंजूर झालेला निधी रद्द केला.

मात्र मांगले ग्रामस्थांच्या बरोबर माझीही मंगलनाथावर श्रद्धा आहे. त्यामुळे मी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारावेळी मंगलनाथाच्या सभामंडपासाठी पुन्हा निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार मंगलनाथ देवालयाच्या समोरच्या प्रशस्त जागेत आता मोठा सभामंडप होणार आहे, त्याचा उपयोग लहान मोठ्या कार्यक्रमांच्या बरोबरच गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यासाठी हा सभामंडप उपयोगी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments