Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना अटक

२३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत....

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड परिसरातील बजरंगनगर भागात तीन पानी जुगार खेळणाऱ्या चार जनाना अटक करून त्याच्या जवळील मुद्देमाल व रोख रक्कम असा एकूण २३ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कुपवाड परिसरातील बजरंग नगर येथील नरेंद्र व्हनकडे यांचे जुन्या घराच्या खोल्यासमोरील मोकळ्या जागेत
तिन पानी पत्याचा जुगारावर पैसे लावून खेळ खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी छापा टाकून चंद्रकांत कल्लाप्पा मोदी वय २३ रा बजरंगनगर, सुनिल मारुती खटके वय २८ रा
बजरंगनगर कुपवाड , अहमद मकसुद खान वय २६ रा जकात नाकाजवळ कुपवाड व तौफीक मुजावर खान वय २७ रा बजरंगनगर कुपवाड यांना अटक केली. त्यांच्या जवळ असणारे सॅमसंग, ओपो, विवो या कंपनीचे तीन मोबाईल फोन व रोख रक्कम दोन हजार चारशे असे एकुण २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments