Daily Mahasatta

Daily Mahasatta

विलगिकरण केंद्रात ग्रामपंचायतीने सुविधा पुरवाव्यात : पालकमंत्री जयंत पाटील

पलूस (अमर मुल्ला) : प्रत्येक गावात चालू केलेल्या विलगिकरण केंद्रात त्या त्या ग्रामपंचायतींनी सोयी सुविधा पुरवाव्यात त्यासाठी दक्षता समितीने कार्यरत रहावे असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

ते पलूस येथे कोरोना बाबत आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पलूस तालुक्यात काम करत असलेल्या प्रशासन, पोलीस यंत्रणेचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, पंचायत समिती सभापती दीपक मोहिते, उपसभापती अरुण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, डॉ. रागिणी पवार, डॉ. अधिक पाटील यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक प्रमुख उपस्थित होते.
नामदार जयंत पाटील यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन त्या त्या गावात प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना दिल्या. 

खासगी दवाखान्यात कोरोनावर उपचार काहि लोक घेतात, त्यांची माहिती प्रशासनाला मिळत नाही, आणि ते रुग्ण बाहेर फिरताना दिसने ही गंभीर बाब आहे. याबाबत त्या हॉस्पिटल ने प्रशासनास रुग्णांची माहिती द्यावी. आणि जर कोणी रुग्ण असे बाहेर फिरताना दिसले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ही दिले.

Post a Comment

0 Comments