Daily Mahasatta

Daily Mahasatta

बोर्गी परिसर बनले मटक्याचे माहेरघर, एपीआय कोळेकर यांच्या चौकशीची मागणी

जत (सोमनिंग कोळी) : जत तालुक्यातील बोर्गी आणि परिसर अवैद्य धंद्याचे माहेरघर बनले आहे. बेकायदेशीर मटका दारू, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने बोर्गी येथील उपसरपंच राघवेंद्र होनमोरे यांच्या नेतृत्वाखाली ही अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी ग्रामपंचायत बोर्गी येथे तीन वेळा ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करण्यात आले. या मंजूर केलेल्या ठरावाला उमदी पोलीस स्टेशनचे एपीआय कोळेकर यांनी सोयीस्करपणे केराची टोपली दाखवून याकडे तिरस्कार आणि दुर्लक्ष केले. 

उलट तक्रार करणाऱ्या ग्रामस्थानाच धमकी देत अवैध धंद्याला पाठीशी घातले. ग्रामस्थानी याविरोधात वरिष्ठांकडे दादा मगितल्याचा राग मनात धरून दस्तुरखुद्द उपसरपंच होनमोरे यांच्यावरच एका भांडणात खोटी फिर्याद द्यायला लावून अन्याय केल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणात कोळेकर यांची चौकशी होऊन कारवाई न केल्यास लॉकडाऊन नंतर कधीही जत प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हंटले आहे.

याबाबत अधिक माहिती असे की, उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्ये सुरू असणाल्या अवैध धंद्या विरोधात बोर्गी ग्रामपंचायत कडून दिनांक ३१/१०/२०२० व दिनांक १३/०३/२०२१ रोजी ग्रामसभा घेऊन मटका आणि दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद होण्यासाठी ठराव पास केला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळविले आहे. या निवेदनामध्ये अवैद्य धंद्याबद्दल काळवूनही या निवेदनाची दखल घेतलेली नाही. उलट मटका दारू धंद्यांना हाताशी धरून ग्रामपंचायतचे उपसरपंच राघवेंद्र होनमोरे यांना पाहुण्यांच्या भांडणात खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्रास दिला जात आहे. अवैध धंदे करणारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांचे दोन नंबर धंदेवाल्याबरोबर संगनमत असल्याने या धंदे वाल्यांचे भाषा उर्मटगिरीची व आव्हानात्मक आहेत. 

आमचे कोण काही वाकडे करू शकत नाही व तसेच आम्ही तुम्हाला असेच सरळ सोडणार नाही अशी भाषा वापरून धमक्या दिली जात आहे. दिनांक २३ मे रोजी राघवेंद्र होनमोरे यांच्या पाहुन्याच्या भांडणात निष्कारण काही काडीचा संबंध नसताना राघवेंद्र होनमोरे यांच्यासह त्यांच्या सख्ख्या भावांची नावे घालून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न कोळेकर यांनी केला आहे. केवळ अवैध धंदे विरोधात आवाज उठवल्याने संगनमताने खोटी फिर्याद द्यायला लावली आहे. खोट्या फिर्यादीचा तपास जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांच्याकडे द्यावा म्हणजे सत्य काय
आहे ते बाहेर येईल असेही निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी उपसरपंच राघवेंद्र होनमोरे यांना अवैद्य धंदेवाल्याने गावात जीव मारण्याची धमकी व जातीयवाचक शिवीगाळ केल्याने उमदी पोलीस स्टेशनकडे फिर्याद देण्यास गेले असताना कोळकर याने सकाळी १० ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत थांबवून घेऊन फिर्याद न घेता उलट फिर्यादीलाच दाब देऊन फिर्याद देण्यास परावृत्त केले आहे. मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे जबरदस्तीने राघवेंद्र होनमोरे यांचेकडून लिहून घेतले आहे. हे सर्व कोळेकर यांचे कडून कटकारस्थान करण्यात आलेला आहे. सध्या उमदी पोलीस ठाण्याचे हद्दीमधील अवैद्य धंदे बाबत आवाज उठवणाऱ्या यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून घेऊन मानसिक त्रास देण्याचा उद्योग कोळेकर यांनी करत आहेत. या कामी त्यांना दोन नंबर धंदे करण्याऱ्याकडून आर्थिक मदत मिळत आहे अवैध धंदेवाले मटकाबुकी व कोळेकर यांची लगेबांधे आहेत. 

त्यामुळे कोणाकडून काहीही निनावी अर्ज घेऊन म्हणजे पोलीस स्टेशन कडून त्रास दिला जात आहे. कुंपणच शेत खाल्ल्यावर कोणाकडे दाद मागायचे असं प्रश्न पडला आहे. होनमोरे परिवाराला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून दस्तुरखुद्द उपसरपंच होनमोरे यांना अटक करण्यापूर्वी व केल्यानंतर कोळेकर यांनी कोण - कोणाशी मोबाईलवरून संपर्क साधला आहे. अटक करण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव आणला या संपूर्ण मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी करावी अशी आमची आणखी एक मागणी आहे.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी होण्यासाठी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करावा यासाठी लॉकडाऊन संपताच जत प्रांत ऑफिस समोर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनात बोर्गी च्या सरपंच सु. शी. कोळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सिद्रामप्पा पाटील, धर्मराय मलेशप्पा पाटील, सुरेश बिरादार, शिवराजकुमार बिरादार, अशोक बरडोल, सुनिल नाईक, विठ्ठल कोळी, प्रकाश कांबळे, तम्माराया बिरादार, दावल पुलूजकर,सिद्राय होनमोरे, मलप्पा कोळी . मताब सनदी, रमेश कांबळे, जिनेसाब पुलुजकर,कलाप्पा बिरादार यांच्यासह ग्रामस्थानच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments