Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कोरोनाने एकाच कुटुंबातील चौघांचा बळी, जिल्हा हादरला

शिराळा (विनायक गायकवाड) : बघताबघता एका दिवसात कोरोनाने पती, पत्नी आणि मुलाचा बळी घेतला तर पुतण्या आठ दिवस पुर्वी कोरोना मयत झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शिराळा तालुक्यातील शिरशी येथे घडली. या घटनेने शिरशी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच दिवशी पती, पत्नी, मुलाचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. 

सहदेव विठ्ठल झिमुर (वय ७५) यांना कोरोनाची लागण झाल्यावर ते २२ दिवस खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांची पत्नी सुशीला (वय ६६) तसेच त्यांचा मुलगा सचिन (वय ३०) खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता तो दीड महिन्यांपूर्वी मुंबई येेेेथून शिरशी येथे आला होता. सुशीला व सचिन यांनाही कोरोनाची लागण झाली. यामुळे त्यांनाही त्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पहाटे ५ वाजता सहदेव यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शिरशी येथे आणण्यात आले त्यांचेवर त्यांचा पुतण्या रोहित व सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. शिराळा नगरपंचायत चे देखील या मृत्यू झालेल्या अंत्यसंस्कारसाठी सहकार्य मिळाले. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पत्नी सुशीला यांचे निधन झाले. लागोपाठ सायंकाळी ६ वाजता मुलगा सचिन याचा मृत्यू झाला. आठ दिवसांपुर्वी पुतण्या जयसिंग पांडुरंग झिमुर वय ५१ याचे खाजगी दवाखान्यात निधन झाले.

एका दिवसात बघताबघता एक कुटुंब संपले. सचिनचा एकच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. वाकुर्डे जिल्हा परिषद सदस्या आशा झिमुर यांचे हे सहदेव काका, सुशीला काकी व सचिन व जयसिंग चुलत दिर होत. तरूथर मनस्वी फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय झिमुर यांचे काका, काकी व चुलत भाऊ होत.

Post a Comment

0 Comments