Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पेठ गावात वीजेचा शाॅक लागून तरुणाचा मृत्यू

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : पेठ ता. वाळवा येथील एका तरुणाचा पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विशाल राजेंद्र कुरणे ( वय-२९) रा. भिमनगर , पेठ ता. वाळवा असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची सुरेश दिलीप कुरणे रा. भिमनगर , पेठ यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की पेठ गावात साधारण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी येते. तिसऱ्या-चौथ्या दिवशी पाणी येत असते. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने सर्वजण मोटार लावून पाणी भरत असतात. नेहमीप्रमाणे आज चौथ्या दिवशी पाणी आल्याने विशाल कुरणे हा पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला. मोटर जोडताना त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. त्या धक्क्याने तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याची प्राण ज्योत मालवली. विशाल हा वंचित बहुजन पक्षाचा तालुकाध्यक्ष होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, वर्षाची मुलगी व एक वर्षाचा मुलगा आहे.

Post a Comment

0 Comments