Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिंचणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

कडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी येथील ग्रामीण रुग्णालयास मा. आमदार श्री मोहनराव (दादा) कदम यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत निधीतून रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा राज्यमंत्री मा. ना. डॉ विश्वजीत कदम साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी प्रांताधिकारी श्री गणेश मरकड, तहसीलदार सौ. डॉ. शैलजा पाटील , सहाय्यक पोलिस निरिक्षक. श्री संतोष गोसावी, डॉ. पौर्णिमा श्रृंगारपुरे, डॉ. मिलिंद मदने, डॉ शिंदे तसेच गावातील सरपंच श्री नंदकुमार माने , डेपोटी सरपंच श्री दिपक महाडीक, मा. जिल्हा परिषद सदस्य श्री वैभव गायकवाड, सोनकिरेचे मा. डेपोटी श्री आनंद राव पाटील,आसदचे सरपंच श्री वैभव जाधव, आजी- माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments