Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ : महावितरणच्या भोंगळ कारभाराने नागरिकांच्या जीवाला धोका

पेठ (रियाज मुल्ला) : महावितरणच्या भोंगळ व अकार्यक्षम कारभारामुळे पेठ येथील पूर्णपणे वाकलेल्या खांबा मुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत ठेऊन जगावे लागत आहे.

पेठ ता. वाळवा येथील ग्रामपंचायतसमोर असणाऱ्या कामेरीकर गल्लीत उभा असणारा विजेचा खांब वाकला असून त्याचा सी आकार झाला आहे.वारंवार तक्रारी ,मागणी होऊन सुद्धा या खांबाची दुरुस्ती झालेली नाही. या खांबाजवळच दवाखाना असून रुग्णांची वर्दळ असते. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते.
या विजेच्या खांबावर काही काम निघाल्यास त्यावर जीव मुठीत घेऊनच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असते. पंख्याखाली निवांत बसून काम करणारे अधिकारी आपल्याच कर्मचाऱ्यांनकडून असल्या खांबा वर काम करायला लावत असतात. काही दुर्घटना घडली तर हे अधिकारी जबाबदारी घेणार का? हा खांब अतिशय धोकायदायक बनला असून संबधीत विभागाने याकडे जातिनिशी लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments