Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ३७ जणांचा कोरोनाने बळी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाने ३७ जणांचा तर म्युकरमायकोसीसने दोघांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आज १०१० इतक्या नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या सात दिवसात कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनामुळे बळी जाणारांची संख्या अजूनही कायम आहे. दररोज जिल्ह्यात पस्तीस ते चाळीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. मृतांचा आकडा निश्चितच चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात सद्या १२ हजार ७८९ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज दिवसभरात १०६२ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आज सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ५०, जत १०७, कडेगाव ३४ , कवठेमंहकाळ ६७, खानापूर ६०, मिरज १०९, पलूस ६४, शिराळा १०३, तासगाव ८८, वाळवा १६५ तसेच सांगली शहर १३० आणि मिरज शहर ३३ असे सांगली जिल्ह्यातील एकूण १०१० रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments