Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा हादरला, प्रशासन झाले हतबल..

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावल्यानंतर देखील कोरोना रुग्णांचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. आज पहिल्यांदाच कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांनी दोन हजाराचा टप्पा ओलांडला असून एकाच दिवशी २३२८ इतके उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. तर आज ५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी आठ दिवस कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात प्रशासन अलर्ट असले तरी नवीन कोरोना रुग्ण संख्येचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद असले तरी लसीकरण केंद्रात उसळणारी गर्दी आणि होम आयसोलेशन मध्ये असलेले कोरोना रुग्ण सद्या सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार, लसीकरण मोहिम, लाॅकडाऊनची अंमलबजावणी, ऑक्सिजनसह औषधांचा पुरवठा करण्यासाठी करावी लागणारी कसरत यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. नागरिकांनी आता प्रशासनाची आणखी परिक्षा न बघता केवळ सोशल डिस्टन्सींगचे नियम पालन, मास्क ,सॅनिटायझर याचा वापर याच्या पलीकडे जाऊन परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. 

आज दिवसभरात सांगली जिल्ह्यातील तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी - २०८, जत -२५६, कडेगाव- २१५, कवठेमंहकाळ- २५६, खानापूर -२४३, मिरज - ३०७, पलूस - ११९, शिराळा- ६६, तासगाव- २५८, वाळवा - १८७ आणि सांगली शहर -१७५, मिरज शहर -१३९ असे एकूण २३२८ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर आज दिवसभरात ११३४ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

Post a Comment

0 Comments