Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री विश्वजीत कदम यांची कोरोना संदर्भात कडेगाव येथे आढावा बैठक संपन्न

कडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव व पलुस तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव प्रांत कार्यालय येथे राज्यमंञी डाॅ. विश्वजीत कदम यांनी कोविड संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी घेतली. यावेळी जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र दुडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील, पलूस तहसीलदार निवास ढाणे दोन्ही तालुक्यातील बीडीओ, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची मिटिंग घ्यावी, असे निर्देश या वेळी दिले. पलूस व कडेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाबद्दल या वेळी समाधान व्यक्त केले. त्यासाठी परिश्रम करीत असलेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व दक्षता कमिटीचे अभिनंदन केले.

कोरोना संसर्गसारख्या बिकट संकटामध्ये अनेक सेवाभावी संस्था जेवण, फळे देत आहेत. त्यांच्याप्रती या आढावा बैठकीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments