Daily Mahasatta

Daily Mahasatta

आम. गाडगीळ यांच्या फंडातून ५ व्हेंटिलेटर प्राप्त

सांगली, ता. ११ ( प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यातच कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची कमतरता भासत आहे. हे लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार निधीतून व्हेंटिलेटर साठी 26 लाख 50 हजारांचा निधी देऊन पाच व्हेंटिलेटर खरेदी करण्यास प्रशासनाला सूचना केली होती. हे पाच वेंटिलेटर आज प्राप्त झाले. 

वसंतदादा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी ते आज कोरोना रुग्णांसाठी उपयोगात यावेत म्हणून जिल्हा प्रशासनाने शासकीय क्रीडा संकुलात सुरू केलेल्या कोविड सेंटरसाठी तसेच बामणोली येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोविड केअर सेंटरला आमदार सुधीर गाडगीळ यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे सपुर्द करून वापरण्यास देण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेश इरळी, डॉ. राम लाडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, भूलतज्ज्ञ डॉ. निरंजन गौडा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, समुपदेशक अविनाश शिंदे गणपती साळुंखे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments