Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात १०० आॅक्सिजन बेडची सोय

शिराळा (विनायक गायकवाड) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील बेडची संख्या तातडीने ७५ वरून १०० करण्याची सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. वाढणारे २५ बेडसाठी लागणारे साहित्य कॉट, गादी, उशी, बेडशीटची व्यवस्था मी स्वतः करणार आहे. बेडसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पाईपलाईनची जोडणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावी. त्यामुळे आता शिराळा उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या १०० होणार आहे. 

शिराळा मतदार संघातील जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर ठेवून राहावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अनिरुध्द काकडे, डॉ. योगिता माने आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments