Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा देवांग युवा फौंडेशनच्यावतीने मंगळवारी रक्तदान शिबिर

विटा (प्रतिनिधी) : देवांग युवा फौंडेशन विटा व देवांग समाज विटा यांच्या वतीने दिनांक मंगळवार ११ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. श्री चौंडेश्वरी मंदिर, लेंगरे रोड रोड विटा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे अशी माहिती देवांग समाज युवा फौंडेशनचे अध्यक्ष सुयश म्हेत्रे यांनी दिली आहे. 

सुयश म्हेत्रे म्हणाले, कोविड १९ ची महामारी व तरुणांच्या लसीकरणानंतर रक्तदानावर किमान ३० दिवसांचे येणारे निर्बंध विचारात घेऊन नजिकच्या काळात रक्तटंचाई होण्याची शक्यता आहे. विट्यातील देवांग युवा फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन केले आहे. लोकांना एकत्र येण्यावरचे निर्बंध व कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. तर दुसरीकडे रक्ताची मागणी वाढताना दिसत अाहे. त्यामुळे विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.
१ मे पासुन १८ वर्षे वयापुढील तरुणांना पण कोविडप्रतिबंधक लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणानंतर किमान ३० दिवस रक्तदान करु नये असे तज्ञांचे मत आहे. याचाही परिणाम म्हणुन जुनमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त टंचाई होऊ शकते. या गोष्टींचा विचार करुन देवांग युवा फौंडेशन विटा व देवांग समाज विटा यांच्या वतीने दिनांक ११ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. श्री चौंडेश्वरी मंदिर, लेंगरे रोड रोड विटा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये सहभागी होऊन हा सामाजीक उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन समस्त देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments