Daily Mahasatta

Daily Mahasatta

जमियत आणि मदनी ट्रस्टने दाखवलं माणुसकीचे दर्शन

सांगली (प्रतिनिधी)
कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना नातेवाईक आणि सगेसोयरे देखील जबाबदारी झटकत असताना मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि जमियत उलेमा ए हिंद (मोलना महमूद मद्नीने) पुढाकार घेत हिंदू पध्दतीने या मृतदेहावर अतिंमसंस्कार करत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.

कोरोनाच्या काळांत मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचे अंतिम संस्कार पार पडणं म्हणजे एक दिव्यच झाल आहे. मरणा अगोदर बेड मिळत नाही आणि मरणा नंतर अंत्यसंस्कार करण्यात अडचण अशा विवंचनेत सापडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य समजून सामाजिक कार्यकर्ते पुढं येत आहेत त्यातीलच सामाजिक संघटना म्हणजे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचया कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलं आहे.

जिथं कोरोनाने कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मयत झाली की, दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी सहसा कोण पुढं येत नाहीत अशीच घटना नागज तालुका कवठेमहांकाळ इथं घडली. आजारी असलेल्या महिलेस मिरज सांगली मध्ये बेडसाठी फिरावे लागले अखेर क्रीडा संकुल मिरज इथल्या कोविड सेंटर मध्ये बेड मिळाल्यानंतर उपचार सुरू असताना तिचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला.

नांगज इथं मृतदेह नेण्याची तयारी झाली पण गावातल्या लोकांनी मृतदेह आणू नका तिकडेच अत्यसंस्कार करा असा निरोप दिला. आता अत्यंसंस्कार पार पडण्याचे दिव्य होते. मृतांच्या नातेवाईकांना मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संपर्क करून दिला. मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासचिव सुफियांन पठाण अॅड. असिफ अत्तर , नेएम पकाली , सलमान शेख, कार्यकर्त्यांनी क्रीडासंकुल इथल्या कोविड सेंटर मध्ये जाऊन सदर महिलेलंच मृतदेह ताब्यात घेण्याचे सोपस्कार पार पाडून हिंदू पद्धतीने मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या स्मशान भूमीत अत्यसंस्कार केले.

कोरोनाने जाती धर्माच्या भिंती पार मोडून काढल्या आहेत. सामाजिक ऐक्य अजूनही जिवंत असल्याचे दाखवून देत प्रत्यक्षात काम करत हे ऐक्य आणखी वृद्धिंगत केलं आहे. मरणा आधी आणि मरणानंतर मृतदेहाची हेळसांड होत असताना अत्यंसंस्कार आणि दफनविधी करून रमजानच्या पवित्र महिन्यात सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंदने पुण्याई कमवत सामाजिक ऐक्याचे दर्शनही घडवलं.

Post a Comment

0 Comments