Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

शिराळा (विनायक गायकवाड) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आज सलग चौथ्या दिवशी सायंकाळी मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यांनी धुमाकुळ घातला आहे. 

वळीवाच्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा, पपई फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. ऊस शेतीला मोठा फटाका बसला असून पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील वैरणी पाण्यात भिजून गेल्या आहेत. शेतातील शेड वरील पत्रे उडून जात असल्याने जनावरांचे हाल झाले आहेत.
वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी व कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लॉक डाऊन मुळे हाल सुरू असतानाच सलग चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा या लोकांचे कंबरडे मोडले आहे.

Post a Comment

0 Comments