Daily Mahasatta

Daily Mahasatta

समडोळीतील स्वाभिमानी कोव्हीड सेंटर मानवतावादी : राजू शेट्टी

समडोळी : येथे स्वाभिमानी कोव्हीड सेंटरचे उद्घाटन करताना माजी खासदार राजू शेट्टी, संजय बेले, महावीर चव्हाण. (छाया - श्रेणीक पाटील समडोळी)

सांगली (प्रतिनिधी) : समडोळी येथील स्वाभिमानी कोव्हीड सेंटरने गेल्या वर्षी कोव्हीड १९ वैश्विक महामारीच्या काळात सेंटरच्या माध्यमातून अनेक पेशंटना जीवनदान दिले आहे. समाजातील प्रत्येक पेशंटना आधार देवून मानवतेच्या भावनेतून सतत मदत केली आहे. सध्या कोरोना संकटाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्ण वाढत असल्याने समडोळीकरांच्या सेवेत पुन्हा उमेदीने न्यु रणझुंझार युवक मंडळाच्या प्रयत्नातून आदिगिरी येथे कोव्हीड सेंटर सुरू केले असून या सेंटरला सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी समडोळी येथील स्वाभिमानी कोव्हीड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलताना व्यक्त केले.

स्वागत व्यवस्थापक दिपक मगदूम, प्रास्ताविक मुख्य प्रवर्तक संजय बेले यांनी केले तर आभार खजिनदार सुरेश पाटील यांनी मानले. 

याप्रसंगी सरपंच विलास अडसूळ, ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळ, डॉ. राहुल रूगे, माजी सरपंच महावीर चव्हाण, सुरगोंडा पाटील, न्यु रणझुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर बेले, उपाध्यक्ष सागर पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले, व्यवस्थापक दिपक मगदूम, खजिनदार सुरेश पाटील, रविंद्र खोत, राजकुमार पाटील, अभिनंदन पाटील, अॅड. सचिन रूगे, भरत पाटील, श्रेणीक पाटील, हर्षद खोत, उत्कर्ष बेले, सम्मेद बेले तसेच गावातील मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments