Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावात कोरोना चे थैमान

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ तालुका वाळवा येथे आज तब्बल 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली.
पेठ गावातील एकूण 12 पुरुष, 5 महिला 2 मुली व एक बालक असा एकूण 20 जणांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे .
वाळवे तालुक्यात आज एकूण 219 रुग्ण सापडले असून पेठ सारख्या ग्रामीण भागात एकाच दिवसात 20 रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोज नवीन रुग्णांची भर पडत असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे आवाहन शंकर पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments