Daily Mahasatta

Daily Mahasatta

कृष्णा साखर कारखान्याच्या उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच

पेठ (रियाज मुल्ला) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडूक उंबरठ्यावर आली असून तालुक्यातील उमेदवारी मिळवण्यासाठी जुन्या व नव्या सभासद कार्यकर्त्यांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहेत. त्यामुळे मोर्चे बांधणीला सुरवात झाली असून तिन्ही गटात उमेदवारी मिळावी म्हणून सभासद कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवायला सुरवात केली आहे.

यावेळी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पेठ ता. वाळवा येथील आम. अरुणअण्णा लाड यांचे कट्टर समर्थक व अविनाश मोहिते यांचे निष्टावंत कार्यकर्ते संग्राम कदम (आप्पा) यांनी अविनाश मोहिते गटातून उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी मागणी पेठ सभासद वर्गातून होत असल्याने नेर्ले तांबवे गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी कदम हे प्रयत्नशील राहणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे संग्राम कदम राजकारणात नेहमीच सक्रिय असतात.

पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा कारखान्याची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची अन चर्चेची अन अत्यंत चुरशीची निवडणूक होत असते. सत्ताधारी सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल, अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनल,तर इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल अशी तिहेरी लढत होणार की राज्यातील महाविकास आघाडीमार्फत संस्थापक पॅनल व रयत पॅनल एकत्रित लढणार ही येणारी वेळ च ठरवणार.

Post a Comment

0 Comments