Daily Mahasatta

Daily Mahasatta

आळसंदमध्ये श्री छत्रपती शिवाजीराजे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु

विटा (प्रतिनिधी) : कोविड -19 मुळे बाधित होणार्‍या रुग्णांची वाढती संख्या असल्याने रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड मुश्किल बनत आहे. अशा परिस्थितीत आळसंद व परिसरातील गावच्या रुग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळण्यासाठी वाझरचे मधुकर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजीराजे हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात आले.त्याचे लोकार्पण शुक्रवारी दि.14 रोजी आळसंद गावच्या सरपंच इंदूमती जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजीराजे हेल्थ केअर सेंटरचे मार्गदर्शक मधूकर सुर्यंवंशी, डाॅ.सागर खाडे, डाॅ.आनंदराव आरबुने, डाॅ.हिम्मत पाटील व डाॅ.शिवम पवार, युवा नेते नितिनराजे जाधव, पोलिस पाटील गणेश शेटे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राहुल कांबळे, विनायक मोरे, प्रविण कदम, संतोष आरबुने, राहुल आरबुने, झहिर मुलाणी, नर्सिंग स्टाफ व आळसंद परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मधुकर सुर्यवंशी म्हणाले, आळसंद व परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना त्वरित आरोग्य सेवा मिळून त्यांचे जीव वाचले पाहिजेत, हा मानवतावादी दृष्टिकोन ठेऊन आम्ही श्री छत्रपती शिवाजीराजे हेल्थ केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर सुरु करण्यासाठी आम्हाला सांगलीचे जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जितेंद्र डूडी जिल्ह्याचे युवा नेते  श्री प्रतिकदादा जयंतराव पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद पोरे, तहसीलदार श्री ऋषिकेश शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल लोखंडे, आळसंदच्या संरपंच इंदूमतीताई जाधव, युवा नेते नितीनराजे जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अनुभवी तज्ञ डाॅक्टर व नर्सिंग स्टाफच्या मदतीने कोविड-19 च्या रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

नितीनराजे जाधव म्हणाले, आळसंद व परिसरातील कोविड पाॅझिटीव्ह रुग्णांना त्वरित उपचार मिळण्याच्या दृष्टीने मधूनाना सुर्यवंशी य‍ांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले श्री छत्रपती शिवाजीराजे कोविड हेल्थ केअर सेंटर निश्चित उपयोगी ठरेल. या परिसरातील नागरिकांच्यावतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

Post a Comment

0 Comments