Daily Mahasatta

Daily Mahasatta

तृतीयपंथीयांच्या मदतीला आमदार अरुण लाड धावले

कडेगाव (सचिन मोहिते) : कोरोनाचे संकट लक्षात घेता बऱ्याच जणांचे जगणे अवघड झाले आहे . लॉकडाऊनमुळे रोजगार उद्योग धंदे बंद असलेमुळे काहिची अन्नाविना उपासमारी सुरु आहे. या गोष्टिंचा विचार करूनच तालुक्यामधील तृतीयपंथीय लोकांना आज तडसर या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे किट आमदार अरुण लाड यांच्याकडून वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम तडसर ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. 

यावेळी आमदार अरुण अण्णा लाड,कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयदीप काका यादव, तडसरचे सरपंच हनमंत पवार, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरेश शिंगटे,क्रांती कारखान्याचे संचालक नारायण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा माजी उपाध्यक्ष वैभव दादा पवार, कडेगाव तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा वैशालीताई मोहिते, महिला उपाध्यक्ष प्रणिता ताई पाटील, पलुस तालुका अध्यक्षा नंदाताई पाटील,जिल्हा कार्यकारणी सदस्य अमोल पाटील,कडेगाव तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष संदेश जाधव, पलुस तालुका युवती अध्यक्षा प्राजक्ता ताई जाधव,राष्ट्रवादी कडेगाव तालुका उपाध्यक्ष सोमनाथ दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव शहराध्यक्ष परवेझ भैय्या तांबोळी,कडेगाव तालुका पदवीधर राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप मदने, विद्यार्थी कडेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष हरी हेगडे, संभाजी पाटील,धैर्यशील पाटील, पत्रकार प्रवीण पवार, माणिक जाधव, अजित मुलानी, आनंदा माने, नवनाथ काकडे, जावेद मोमीन, समीर मुल्ला, विकास पवार, राजेंद्र पाटील, किरण पवार, संजय पवार, पवन पवार, चंद्रकांत पाटील,व कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments