Daily Mahasatta

Daily Mahasatta

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढला : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राच्या रुग्णवाढीचा दर भारताच्या
रुग्णवाढी दराच्या निम्मा आहे. त्यामुळे ही रुग्ण संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याची मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करतील, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या बैठकीत लाॅकडाऊन वाढविण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. 

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्ण संख्या कमी झाली. लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 7 लाखांवरून 4 लाख 75 हजारावर आली. त्यामुळे कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी आता 31 मे पर्यंत लॉकडाऊन करावा, अशी मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहिर करतील, अशी माहिती आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.

राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात 18-44 वोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलं. 45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळे दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे.

राज्यात सद्या 16 लाख कोविशिल्ड , तर 4 लाख कोव्हॅक्सिन अशी 20 लाख लस बाकी आहे. 7 लाख कोविशिल्ड, तर 4 लाख कोव्हॅक्सिन घेणारंची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसर लस देणसाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments