Daily Mahasatta

Daily Mahasatta

मांगले येथील संस्था विलगीकरण सेंटर आदर्श : जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी

मांगले (राजेंद्र दिवाण) : कोरोनाची संक्रमण साखळी रोखण्यासाठी मांगलेकरांनी केलेले संस्था विलगीकरण सेंटर एक आदर्श असून जिल्ह्यातील इतर गावांनी यांचे अनुकरण करावे असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी केले. तसेच  ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केलेल्या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. असेच काम यापुढे चालू ठेवून गाव कोरोनामुक्त करुया असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी यावेळी बोलताना केले.

 जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास मांगले प्राथमिक मुलांच्या शाळेतील कोरोना विलगीकरण केंद्रास  व आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी डॉक्टर, सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांच्याकडुन  संस्था विलगीकरणातील रुग्णाच्या सोयी-सुविधाबाबत आढावा घेतला यावेळी ३३ रुग्ण दाखल असल्याचे सांगण्यात आले. यानांतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून कोरोना रुग्णासाठी असलेल्या विशेष कक्षास भेट देवून पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्रातील सर्व विभागांना भेटी देवून पाहणी केली. 

यावेळी कोरोना रुग्णासह दररोज येणारे विनाकोवीड रुग्ण संख्या, त्यांना पुरविण्यात येणा-या सुविधा ,ओषधांची उपलब्धता यासंबधी  माहिती घेतली. यावेळी आवश्यक कर्मचारी नसल्याने अडचणी येत असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ नरेंद्र घड्याळे यांनी दिली. यावेळी कोरोना लसीबद्दलही माहिती घेवून रजिस्टरची पाहणी केली.  तसेच गर्दी न करता योग्य नियोजनाने लस देण्याच्या सुचना डॉ चौधरी यांनी केल्या. यावेळी लसीचा जादा साठा  देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मंगलनाथ  उद्योग समूहाचे प्रमुख माजी सरपंच विजय पाटील यांनी दाखल रुग्णासाठी लागणारे सॉनिटाझर,साबण व खाद्य पदार्थांचे कीट दिले. त्याचे वाटप जिल्हाधिका-यांचे हस्ते करण्यात आले. तर डॉ सतिश पाटील व डॉ नितीन पोर्लेकर यांनी रुग्णांशी संवाद साधून होमोपॅथिक ओषधे तपासणी करुन मोफत दिली.

यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे, डॉ जायसिंग पवार, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण पाटील, सरपंच सौ मिना बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे, माजी सरपंच विजय पाटील, उदय पाटील, पोपट चरापले, उत्तम गावडे, संदिप तडाखे, संतोष उत्तरकर, राजेंद्र पाटील. तलाठी सुभाष बागडी, ग्रामसेवक आडके यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments