Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात २६ मे पर्यंत दुकाने बंद राहणार

सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 18 मे सकाळी 7 वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या कडक निर्बंधांना 19 मे सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहे. तर दिनांक 19 मे सकाळी 7 वाजल्या पासून 26 मे सकाळी 7 वाजेपर्यंत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशान्वये किराना, भाजीपाला बेकरी आणि फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देणेस परवानगी असेल. सदर दुकानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू / सेवा देणेसाठी किंवा पार्सल देणेसाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खाते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु राहतील. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दि.19 ते 22 मे रोजीचे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फक्त किराणा साहित्याचे घाऊक विक्रेते यांचेकडून फक्त किरकोळ किराणा विक्रेते यांना खरेदी करणेस परवानगी देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील इतर सर्व व्यवहार बंद राहतील असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 

1. कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी 
अ. सांगली जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे.
ब. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. 
क. खाली नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. 
ड. खालील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. 
इ. सदर आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना (Exemption Category मुद्दा क्र..5 मध्ये नमूद बाबी व आस्थापना) यांना सकाळी 7वाजलेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी असेल.
2. अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल
1) रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.
2) व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स
3) दुध विक्री केंद्रे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. घरपोच दुध वितरणास परवानगी असेल
4) किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देणेस परवानगी असेल. सदर दुकानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू / सेवा देणेसाठी किंवा पार्सल देणेसाठी मनाई करणेत येत आहे. त्यामुळे सदर दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत.
5) शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खाते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा सकाळी 7 ते 11 सुरु राहतील
6) कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दि.19 ते 22 मे रोजीचे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फक्त किराणा साहित्याचे घाऊक विक्रेते यांचेकडून फक्त किरकोळ किराणा विक्रेते यांना खरेदी करणेस परवानगी असेल. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील इतर सर्व व्यवहार बंद राहतील. तसेच सदर ठिकाणी लोकांची गर्दी होणार नाही / राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कॉव्हीड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेत येईल याची दक्षता पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी घेणे बंधनकारक राहील. 
7) शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
8) शीतगृहे व गोदाम सेवा
9) स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम
10) स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा
11) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे विहित केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा
12) भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ ” (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज (stock exchanges), डिपॉजिटर्स (Depositories) व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स (Clearing Corporations) व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट
13) टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा
14) वस्तूंची वाहतूक
15) पाणीपुरवठा सेवा
16) ई – व्यापार ( फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी )
17) प्रसार माध्यमे (Media)
18) पेट्रोल / डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, मालवाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील.
19) सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा
20) मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरु राहतील. तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकानधारकांनी सरळ गॅरेज मध्ये करणेस परवानगी असेल. स्पेअरपार्ट ची दुकाने सुरु ठेवणेस प्रतिबंध असेल.
21) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
22) विद्युत व गॅस पुरवठा सेवा
23) ATM’s
24) टपाल सेवा
25) लस / औषधे / जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाउस एजंट (Custom House Agent) / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (Multi Modal Transport Operators) 
26) कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging meterial) ची उत्पादन केंद्रे
-
-
वर नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.
-
1. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण / संस्था यांनी हि बाब लक्ष्यात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध / निर्बंध नसून सदरचे निर्बंध / प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत.
2. यामध्ये नमूद केलेल्या सर्व सेवांची वाहतूक हि वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
3. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळकाळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील.

या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खाली निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
-
अ. संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारी व ग्राहक हे कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.
ब. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी.
क. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर र.रु.500/- इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड – 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड – 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना / दुकान बंद केले जाईल.
ड. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
इ. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.

3. सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील – 
- i. व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. 
- ii. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट बंद राहतील. 
- iii. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.
- iv. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापनाबंद राहतील
- v. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री
- vi. रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील

-
4. प्रवासी वाहतूक
-
अ) सार्वजनिक वाहतूक
-
1. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील. 
-
2.. इतर सार्वजनिक वाहतूक (उदा. रिक्षा, टैक्सी - 4 चाकी ) हि अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी खालील क्षमतेप्रमाणे सुरु राहतील.
रिक्षा – चालक + 2 प्रवासी
टैक्सी ( 4 चाकी ) - चालक + RTO नियमाच्या 50 % प्रवासी+

3. वाहतुकीदरम्यान खालील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी

i. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. 
ii. टैक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.
iii. प्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
iv. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड – 19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टैक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.
v. सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.
vi. रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीमध्ये ( General Compartment ) कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी.
vii. रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.
viii. सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवातुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील.
ix. बस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल. 
-
ब. खाजगी वाहतूक

अ. सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील
• खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक ही फक्त आपत्कालिन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी वाहन चालक + प्रवासी आसन क्षमतेच्या 50 % प्रवासी इतक्या क्षमतेने सुरु राहणेस परवानगी असेल. सदरची प्रवासी वाहतूक हि आंतर जिल्हा किंवा आंतर शहर असणे अपेक्षित नाही आणि ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच मर्यादित असावी. 
• आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासी वाहतूकीस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालिन वैद्यकीय परिस

Post a Comment

0 Comments