Daily Mahasatta

Daily Mahasatta

लहान मुलांमधील कोरोना घातक नसेल, वाचा कसे असेल कोरोनाचे स्वरुप

सांगली (प्रतिनिधी) : आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचतर्फ़े आयोजित करण्यात लहान मुलांना होणाऱ्या कोविडपासून संरक्षण करण्यासाठी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या 'फेसबुक लाईव्ह' या कार्यक्रमात मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांमधील कोरोना इतका गंभीर नसतो. कोरोनाचा फारसा त्रास होत नसेल तर मुलांना शक्यतो घरीच ठेवावे. त्या काळात त्याला आईचा सहवास अधिक हवा असे मत बालरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे धीरज सूर्यवंशी, विश्वजित पाटील, चेतन माडगूळकर यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला यामध्ये लहान मुलांना होणाऱ्या कोविडपासून संरक्षण करण्यासाठी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी झालेल्या 'फेसबुक लाईव्ह' या कार्यक्रमात उपस्थित सर्व बालरोग तज्ज्ञ बोलत होते. स्वागत करताना आ. गाडगीळ यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या टर्म मधील २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

डॉ. सुहास भावे म्हणाले, 'सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. पहिली लाट येऊन गेली त्याला बराच काळ लोटला आहे. आता स्वरूप बदलले आहे. लहान मुलांना होणार कोरोना मोठ्यांकडून संक्रमित झाल्याने होतो. आपल्यापेक्षा लहान मुलांची प्रतिकार शक्ती थोडी वेगळी असते. ताप, सर्दी, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी चार लक्षणे फ्लू सारखी असतात, या गोष्टी आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. अनेकदा कोविड झालेले घरातील लोक सांगतच नाहीत. ९० टक्के मुलांचा आजार फ्लूच्या हेडींगखाली ४ ते ५ दिवसात बरा होतो. काहींना यासाठी जास्त कालावधी जास्त लागतो. आमच्यावर अनेकदा सर्व टेस्ट करा यासाठी पालकांचा दबाव येतो. घरातील कोणी कोविड रुग्ण नसेल आणि मुलगा संक्रमित असेल तर दुसऱ्या माणसांना तो संक्रमित करू शकतो. रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांना लहान मुलांच्या माध्यमातून होऊ शकतो. कोणताही आजार अंगावर काढू नका. तिसऱ्या लाटेला षङत्रीय आधार आहे. इम्युनिटी व लस नाही त्यांना याची शक्यता जास्त आहे. संक्रमण पहिल्या लाटेपासून आहे.

डॉ. शरद घाटगे म्हणाले, कोविड हा घरच्यां पासून झालेला असतो. बाहेरून कोविड होण्याची शक्यता फर कमी असते. लहान मुलांना कोविड झाल्यास ते कॅरियर म्हणून काम करतात. लहान मुलांना त्रास होत नसेल तर त्याला कशासाठी कोविड केसर सेंटर मध्येव ठेवायचे. याकाळात त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या जवळ राहावे. सध्या शाळा व क्रीडांगणे बंद आहेत. अशातच त्याला कोविड सेंटर मध्ये ठेवल्यास त्याच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मुलांना शक्यतो घरातच आयसोलेट करा. त्याला आईचा सहवास अधिक लाभू द्या जास्त त्रास वाटल्या वरच त्याला कोविड सेंटरमध्ये ठेवा.

Post a Comment

0 Comments